Advertisement

नॉन फार्मासिस्टचे फार्मासिस्ट होण्याचे स्वप्न भंगले


नॉन फार्मासिस्टचे फार्मासिस्ट होण्याचे स्वप्न भंगले
SHARES

मुंबई - उत्तर भारतात फार्मासिस्टची कमतरता असल्यानं औषध विक्रेते अडचणीत आल्याचं सांगत, नॉन फार्मासिस्टना फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता हा प्रस्तावच बासनात गुंडाळला जाणार आहे. कौन्सिलच्या या निर्णयाचं देशभरातल्या फार्मासिस्ट संघटनांकडून स्वागत केलं जातंय.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने हा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याकडे पाठवला होता. त्यानुसार आरोग्य खात्यानं तो मंजुरीसाठी कौन्सिलकडे पाठवला. पण या प्रस्तावाचे दुष्परिणाम लक्षात घेता आणि या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी लक्षात घेता कौन्सिलने हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा