Advertisement

मुलीनं यकृत दान करून वाचवले वडिलांचे प्राण


मुलीनं यकृत दान करून वाचवले वडिलांचे प्राण
SHARES

अवयव दान किती महत्त्वाचे आहे?, याचे जीवंत उदाहरण मुंबईत राहणाऱ्या एका २४ वर्षांच्या तरुणीने दाखवून दिलं आहे. नेहा जगदीश पटेल या मुलीनं आपल्या वडिलांना यकृत दान करत त्यांना जीवनदान दिलं आहे. नेहाचे वडील जगदीश पटेल (५०) गेल्या सहा महिन्यांपासून यकृताच्या आजारानं त्रस्त होते. त्यांचं यकृत ८० टक्के निकामी झालं होतं. त्यामुळं त्यांची जगण्याची शक्यता कमी होती. 

त्यांच्या या आजारावर काहीच इलाज नाही. त्यांच्यासाठी मृत व्यक्तीचे अवयव उपयुक्त ठरतील, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हे ऐकून नेहा आणि तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. मृत व्यक्तीचे अवयव मिळण्याच्या प्रक्रियेला कधी कधी खूप कालावधी लागतो आणि नेहाच्या वडिलांकडे फक्त एक महिन्याचा कालावधी होता. त्यामुळं नेहानं आपल्या वडिलांना यकृत देण्याचं ठरवलं. त्यामुळं आज सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

३१ ऑगस्टला एका खासगी रुग्णालयात नेहाच्या वडिलांवर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती ठीक असून येत्या गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

मुलीच्या या कार्यामुळे वडील देखील खूप आंनदी आहेत. आपल्या कर्तबगार मुलीमुळंच आज आपल्याला दुसरं आयुष्य मिळाल्याची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली.


वडील खूप आजारी होते. त्यामुळं काही दिवसानंतर ते आपल्यात नसतील की काय असं वाटत होतं. पण जेव्हा यकृत दानाबद्दल ऐकलं तेव्हापासून वडिलांना यकृत दान करण्याचं ठरवलं. मी वडिलांसाठी काहीतरी करू शकले याचा मला खूप गर्व आहे. मी विवाहित आहे. खरंतर माझ्या सासरच्या मंडळींचा देखील यात मोलाचा वाटा आहे. त्यांची साथ होती म्हणून मला यकृत दान करता आलं.

- नेहा पटेल



हेही वाचा - 

मृत्यूनंतरही ठेवला सामाजिक वसा कायम, जेजेत दुसरं कॅडेव्हरीक अवयवदान

सेंट झेवियर्सच्या 54 विद्यार्थ्यांचा अवयवदानाचा संकल्प



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा