Advertisement

सेंट झेवियर्सच्या 54 विद्यार्थ्यांचा अवयवदानाचा संकल्प


सेंट झेवियर्सच्या 54 विद्यार्थ्यांचा अवयवदानाचा संकल्प
SHARES

अवयवदान हे आता काळाजी गरज आहे. त्यासाठी मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वांमध्येच अवयवदानाचे महत्त्व आणि जनजागृती निर्माण होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर एस. एल. रहेजा रुग्णालयाची शैक्षणिक संस्था असलेल्या सेंट झेवियर्स पॉलिटिकल सायन्स असोसिएशन या संस्थेच्या अवयवदानाच्या जागृतीमध्ये त्या कॉलेजच्या 300 विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. या उपक्रमात जवळपास 54 विद्यार्थ्यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.

या व्यतिरिक्त कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या एखाद्या रुग्णावर त्वरित उपचार सुरू करण्याच्या प्रक्रियेतील कार्डिओकल्मोनरी रिस्युसिटेशन (सीपीआर) या उपचार पद्धतीविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी काही प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच, विद्यार्थ्यांना प्रथमोपचारांविषयीदेखील प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले.

अवयवदानाची वाढती गरज आणि महत्त्व याबाबत एका विशेष चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यात रहेजा रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समन्वयक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यात कोणत्या अवयवांचे दान करावे, ब्रेनडेडे म्हणजे काय, अवयवांची साठवणूक कशी केली जाते, त्यासोबतच अवयवदान करण्यासाठी काय करावे यासंदर्भातही डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकून उपस्थितीत 54 विद्यार्थ्यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.

- डॉ. बिपीन चेवाळे, विभागीय संचालक, रहेजा रुग्णालय

आपत्कालीन स्थितीत रुग्णांना कशाप्रकारे मदत पुरवता येईल यासंदर्भात रहेजा रुग्णालयातील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जेणेकरून भविष्यात गरज भासल्यास विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा वापर करता येईल, असे सेंट झेवियर्स पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या विभागप्रमुख प्रतिभा नैथानी यांनी सांगितले.


हेही वाचा - 

मृत्यूनंतरही ठेवला सामाजिक वसा कायम, जेजेत दुसरं कॅडेव्हरीक अवयवदान

दानशूर मुंबईकर...वर्षातलं 34वं अवयवदान नानावटीमध्ये यशस्वी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा