Advertisement

सैफी रुग्णालयात अवयवदान, वाचला तरुणाचा जीव


सैफी रुग्णालयात अवयवदान, वाचला तरुणाचा जीव
SHARES

हळहळू का होईना पण अवयवदानाचे महत्त्व प्रत्येकाला कळू लागले आहे. त्यामुळेच अनेक जण अवयव दानासाठी पुढे येत आहेत. त्याचप्रमाणे आता 61 वर्षाच्या मृत व्यक्तीचे अवयवदान त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. त्यामुळे मुंबईतील सैफी रुग्णालयात 26 वर्षाच्या तरुणाचा जीव वाचला आहे.

सोमवारी डोकेदुखीच्या त्रासामुळे चिराबाजार येथील 61 वर्षीय व्यक्ती सैफी रुग्णालयात दाखल झाली होती. पण, त्यांना होणारा डोकेदुखीचा त्रास एवढा तीव्र होता की, त्यात त्यांचा जीव गेला.

12 ऑगस्टला त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना विचारूनच त्यांचे अवयवदान करण्यात आले.

 - डॉ. शबीना खान, समन्वयक प्रत्यारोपण विभाग, सैफी रुग्णालय

या व्यक्तीचे यकृत अपोलो रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आले आहे. तसेच, एक किडनी फोर्टिस रुग्णालयात देण्यात आली आणि दुसरी किडनी सैफी रुग्णालयातील एका 26 वर्षीय तरुणाला देण्यात आली आहे. ज्याला ही किडनी देण्यात आली आहे, तो तरुण गेली अनेक वर्ष डायलेसिसवर होता. त्यामुळे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया डॉ.शबीना यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.

शिवाय, या व्यक्तीचे डोळे बच्चूअली या डोळ्यांच्या रुग्णालयात देण्यात आले आहे. तब्बल 12 तासानंतर समजावल्यावर कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. आपली व्यक्ती अवयवदानातून आपल्या सोबत राहील हे जेव्हा कुटुंबियांना समजावले त्यानंतरच त्या व्यक्तीचे अवयवदान केले, असेही डॉ.शबीना खान यांनी स्पष्ट केले.


आतापर्यंत झालेले अवयवदान

2015 मध्ये मुंबईत 42 वेळा अवयवदान करण्यात आले होते. यात 37 यकृत, 72 मूत्रपिंड आणि 5 हृदय दान केले गेले. या अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळाले होते.

2016 मध्ये अवयवदानात दुपटीने वाढ झाली होती. यंदाच्या वर्षी 2017 मध्ये मुंबईत आतापर्यंत 33 वेळा अवयवदान झालंय. 40 मूत्रपिंडं, 29 यकृतं, 20 हृदय आणि एका फुफ्फुसाचं दान करण्यात आलंय. यावरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेली अवयवदानाविषयची जागरुकता कायम असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा - 

मृत्यूनंतरही 'त्या'ने वाचवले 6 जीव!

हेच खरे ‘दान’शूर!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा