Advertisement

दिलासा, राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

महाराष्ट्रात सोमवारी नवीन कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

दिलासा, राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) सोमवारी नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसभरात कोरोनाचे ६ हजार ४७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १० हजार ८१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच  १०१ रुग्णांचा मृत्यू (death) झाला आहे. 

राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका झाला आहे. तर आतापर्यंत एकूण ५८ लाख ०० हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईत सोमवारी ६०८ रुग्ण आढळले. तर  ७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९४ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८ हजार ४५३ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. तर २१ जून ते २७ जून दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.०९ टक्के राहिला आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ८७४ झाली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १७ हजार ०४२ आहे. ठाण्यात १६ हजार १४१ तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ८७५ आहे. सांगलीत ही संख्या ९ हजार ६१२, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ६६२, रत्नागिरीत ५ हजार २३२, रायगडमध्ये ५ हजार ५६१, सिंधुदुर्गात ५ हजार २०१, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार २७१ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार १८५ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ६११
  • ठाणे     ८८
  • ठाणे मनपा       ९८
  • नवी मुंबई मनपा ९५
  • कल्याण डोंबिवली मनपा         ६४
  • उल्हासनगर मनपा        १०
  • भिवंडी निजामपूर मनपा ३
  • मीरा भाईंदर मनपा        ५६
  • पालघर ५५
  • वसईविरार मनपा         ९९
  • रायगड २५८
  • पनवेल मनपा    १४१
  • ठाणे मंडळ एकूण        १५७८
  • नाशिक १७६
  • नाशिक मनपा   ८५
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर      २२१
  • अहमदनगर मनपा        २
  • धुळे     ३
  • धुळे मनपा       २
  • जळगाव          १२
  • जळगाव मनपा  ३
  • नंदूरबार ५
  • नाशिक मंडळ एकूण     ५१०
  • पुणे      ३७५
  • पुणे मनपा        १६२
  • पिंपरी चिंचवड मनपा    १७८
  • सोलापूर          २२१
  • सोलापूर मनपा  १४
  • सातारा ४७९
  • पुणे मंडळ एकूण         १४२९
  • कोल्हापूर        ९१७
  • कोल्हापूर मनपा ३८७
  • सांगली ६०५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा    १३२
  • सिंधुदुर्ग ३४६
  • रत्नागिरी         ३६३
  • कोल्हापूर मंडळ एकूण  २७५०
  • औरंगाबाद       ३१
  • औरंगाबाद मनपा         १३
  • जालना १६
  • हिंगोली ८
  • परभणी ३४
  • परभणी मनपा   ४
  • औरंगाबाद मंडळ एकूण १०६
  • लातूर   १०
  • लातूर मनपा     ६
  • उस्मानाबाद     ४२
  • बीड     १३०
  • नांदेड   ३
  • नांदेड मनपा     २
  • लातूर मंडळ एकूण       १९३
  • अकोला          ४
  • अकोला मनपा  ४
  • अमरावती       १६
  • अमरावती मनपा          ६
  • यवतमाळ        ८
  • बुलढाणा         ५७
  • वाशिम ७
  • अकोला मंडळ एकूण   १०२
  • नागपूर  ५
  • नागपूर मनपा    २२
  • वर्धा     ०
  • भंडारा  १
  • गोंदिया ४
  • चंद्रपूर   ४
  • चंद्रपूर मनपा     ३
  • गडचिरोली      २०
  • नागपूर एकूण    ५९



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी-विरार मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

रेल्वे तिकीटाच्या आरक्षणासाठी लागणार आधार, पॅनकार्ड?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा