Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

कोरोना रोखण्यासाठी 'मुंबई मॉडल' आता दिल्लीत राबवणार, दिल्लीतल्या मंडळाची मुंबईला भेट

दिल्लीवरून आलेल्या मंडळानं कोरोना रोखण्यासाठीचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार असल्याचं स्पष्ट केलं.

कोरोना रोखण्यासाठी 'मुंबई मॉडल' आता दिल्लीत राबवणार, दिल्लीतल्या मंडळाची मुंबईला भेट
SHARES

कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई मॉडेलची सर्वत्र चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील दिल्ली सरकारला मुंबई मॉडल राबवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार दिल्ली सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आलं होतं.

प्रतिनिधी मंडळानं मुंबईतील ‘वॉर्ड वॉर रुम’, जम्बो रुग्णालयांची पाहणी केली. तसंच सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचं ‘मुंबई मॉडल’ दिल्लीत राबवणार असल्याचं या प्रतिनिधी मंडळानं स्पष्ट केलं.

दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला होता. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले.

दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पालिका करीत असलेले कोविड रुग्ण व्यवस्थापन आणि ‘बेड अलॉटमेंट’ समजावून घेण्यासाठी ‘डी’ व ‘के पूर्व’ या दोन विभागांच्या नियंत्रण कक्षांना भेट दिली. ज्या व्यक्तींना कोविड बाधा झाली आहे, त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल हे सर्वप्रथम महापालिकेच्या ‘वॉर रुम’ कडे प्राप्त होतात. त्यानंतर रुग्णांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला जातो व त्यांचे प्राथमिक समुपदेशन देखील केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार महापालिकेचा चमू सदर व्यक्तीच्या घरी जाऊन आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करतो. या दरम्यान सदर रुग्णास रुग्णालयात दाखल करणे, वैद्यकीय उपचार गरजेचे असल्यास रुग्णाला त्याच्या गरजेनुसार खासगी वा सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले जाते.

पालिकेने ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करून प्रभावी रुग्णसेवा कशी साध्य केली आहे, याबाबतची माहिती देखील दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली. विशेष म्हणजे या प्रतिनिधीमंडळाने प्रत्येक माहिती स्वत: रुग्णालयात जाऊन घेतली.

यासोबतच गोरेगाव परिसरातील (Goregaon) नेस्को (Nesco) प्रदर्शन केंद्राच्या जागेत महापालिकेद्वारे (BMC) उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयास भेट दिली. तिथं उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा आणि करण्यात येत असलेली विविधस्तरीय उपाययोजनांची त्यांनी तपशीलवार माहिती घेतली.

तसंच सदर ठिकाणी असणारे ‘डायलिसिस बेड’, ‘आयसीयू बेड’ आणि ‘ऑक्सिजन बेड’ याबाबतही त्यांनी तपशीलवार माहिती जाणून घेतली. यावेळी या प्रतिनिधींनी मुंबईच्या धर्तीवर दिल्लीमध्ये देखील जम्बो रुग्णालये उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं.हेही वाचा

मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा