Advertisement

'अॅक्टिव्ह ट्रॅकर' आणि 'कन्फ्युज्ड' डॉक्टर्स


'अॅक्टिव्ह ट्रॅकर' आणि 'कन्फ्युज्ड' डॉक्टर्स
SHARES

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जाहीर केला. पण मंत्रिमहोदयांनी जाहीर केलेला निर्णय डॉक्टरांच्या डोक्यातला गोंधळ संपवण्याचं नाव घेत नाही. सोनोग्राफी मशिनला अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवण्यात येणार नाही, असं डॉ दीपक सावंत यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने डॉक्टरांची मतं जाणून घेण्यासाठी बुधवारी नरिमन पॉइंटमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात घेतलेल्या बैठकीमध्ये या विषयावर गोंधळलेल्या मानसिकतेतले डॉक्टर्स पहायला मिळाले. 

राज्य महिला आयोग यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सोनोग्राफी मशिनमध्ये अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवू नका, ही आग्रही मागणी करणाऱ्या डॉक्टरांची संख्या जास्त आहे. बैठकीत बहुसंख्य डॉक्टरांचा सूर अॅक्टिव्ह ट्रॅकरच्या विरोधात दिसला. या नकारासाठी ठोस युक्तिवादही या डॉक्टरांनी केला. काही डॉक्टर्स मात्र अॅक्टिव्ह ट्रॅकरचे फायदे पटवून देताना दिसले. थोडक्यात या विषयावर डॉक्टरांमध्ये दोन गट पडले आहेत. 

गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक (पीसीपीएनडीटी) आणि एमटीपी या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी हा कळीचा विषय ठरतोय. या कायद्यांचं पालन कसोशीनं होणं गरजेचं असल्याबाबत मात्र डॉक्टरांमध्ये एकमत दिसलं. अॅक्टिव्ह ट्रॅकरच्या विषयावर विस्ताराने चर्चा झाली खरी, पण अॅक्टिव्ह ट्रॅकरची उपयुक्तता आणि हाताळणी याबाबत मात्र डॉक्टरांमध्ये मतभिन्नता होती. परिणामी, याबाबत वेट अॅंड वॉच ची भूमिका घेण्याचा पर्याय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना स्वीकारावा लागला आहे. 

रहाटकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना मुलींचा जन्मदर वाढत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. 


राज्य महिला आयोग हा सर्व महिलांसाठी आहे. त्यामुळे अनेक केसेस आमच्याकडे आहेत. त्यापैकी बऱ्याच केसेस आम्ही सोडवल्या आहेत. अॅक्टिव्ह ट्रॅकरबद्दल फारशी माहिती ही डॉक्टरांना नाही आहे. 2010 साली कोल्हापूरला अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवण्यात आला होता. पण, ते प्राथमिक तत्वावर होते. ते पूर्णही झालेले नाही. एखादा निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ती सिस्टीम बंद झाली आहे. मी स्वत: इंदोरला जाऊन याबाबतची पाहणी केली आहे. पण आपल्याकडे अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवावा की नाही, यावर सगळ्यांचा विचार घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अजूनतरी यावर काहीच निर्णय झालेला नाही.

- विजया रहाटकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग


हेही वाचा - 

पालिकेच्या टीबी विभागात येणार जीन एक्सपर्ट मशिन

'या' मशिनमुळे केमोथेरपीदरम्यान केस गळणार नाहीत!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा