Advertisement

'या' मशिनमुळे केमोथेरपीदरम्यान केस गळणार नाहीत!


'या' मशिनमुळे केमोथेरपीदरम्यान केस गळणार नाहीत!
SHARES

कॅन्सर हा आजार झाला की केमोथेरेपी घेण्यासाठी रुग्णांना वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. जेवढा वेळ केमोथेरेपी दिली जाते, तेवढा वेळ शरीरात रसायन जाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यातून उपचार होत असले तरी डोक्यावरच्या केसांचं प्रमाण मात्र कमी होतं. याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो.

याच गोष्टीवर उपाय म्हणून मुंबईच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने एक रिसर्च केला आहे. त्या रिसर्चमध्ये त्यांनी केमोथेरेपीमुळे टाळूलावर निर्माण होणाऱ्या उष्णतेवर थंडावा कसा मिळू शकेल, यावर संशोधन केलं. या तपासणीसाठी ‘स्काल्प कूलिंग मशिन’चा वापर करण्यात येत आहे.  सुरुवातीला या मशिनने 4 महिलांवर प्रयोग करण्यात आला. पण, आता जवळपास 30 महिलांवर या मशिनचा वापर करण्यात आला आहे.

कॅन्सर होऊन जर डोक्यावरचे केस गेले, तर अशा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. पण, या उपचार पद्धतीमुळे केमोथेरेपी दिल्यानंतर केसांचं गळणं थांबवता येऊ शकतं. आधीच्या मशिनला थंड करण्यासाठी ठेवावं लागत होतं. पण, ही नवीन मशीन आपोआप थंड होते. त्यामुळे हे मशिन वापरणं सोपं जातं.

प्रा. डॉ. ज्योती बाजपेयी, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, टाटा 

प्रायोगिक तत्वावर या ‘स्काल्प कूलिंग मशिन’चा फायदा कॅन्सरग्रस्त रुग्णांना होत आहे का? याची माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. या उपचार पद्धतीचा वापर परदेशात केला जातो. पण, मुंबईसारख्या मोठ्या शहरात या पद्धतीचा वापर करणारे टाटा मेमोरियल हे एकमेव रुग्णालय आहे. वर्षाला कर्करोगाने त्रस्त झालेले साडे चार हजार नवीन रुग्ण या रुग्णालयात येतात. त्यामुळे या रुग्णालयात सध्या स्तनांचा कर्करोग असलेल्या महिलांवर केमोथेरपी दरम्यान ‘स्काल्प कूलिंग मशिन’ च्या सहाय्याने उपचार केले जात आहेत.

या मशिनची किंमत खूप जास्त असून टाटा रुग्णालयात क्लिनिकल ट्रायल्ससाठी दोन मशिन मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्तनाच्या कर्करोगावर उपचार सुरू असलेल्या 30 महिलांना या ट्रायल्ससाठी निवडण्यात आले आहे.

प्रा. डॉ. ज्योती बाजपेयी, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, टाटा 


‘स्काल्प कूलिंग’ म्हणजे काय?

  • केमोथेरपी सुरू असताना हे मशिन महिलेच्या डोक्यावर बसवलं जातं
  • या मशिनचं तापमान उणे-४ अंश सेल्सियस ठेवलं जातं
  • मशिन थंड असल्याने स्काल्प (टाळू) थंड राहतो
  • स्काल्पमधील रक्तवाहिन्यांना रक्त पुरवठा होत नाही
  • यामुळे तीव्र रसायनांचा केसांवर परिणाम होत नाही

डॉक्टरांच्या माहितीनुसार, केमोथेरपी प्रक्रिया संपेपर्यंत हे मशिन रुग्णाच्या डोक्यावर ठेवलं जातं. या प्रक्रियेला साधारणत: तीन ते चार तास लागतात.



हेही वाचा

कर्करोग रुग्णांसाठी 'माय हेअर फॉर कॅन्सर' उपक्रम


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा