स्तनांच्या कर्करोगावर कृत्रिम स्तनांचा पर्याय

Mumbai
स्तनांच्या कर्करोगावर कृत्रिम स्तनांचा पर्याय
स्तनांच्या कर्करोगावर कृत्रिम स्तनांचा पर्याय
See all
मुंबई  -  

एखाद्या महिलेला स्तनांचा कर्करोग झाला, की अनेकदा उपचारांदरम्यान स्तन काढून टाकावे लागतात. आजारामुळे आपल्याला आपला एक अवयव गमवावा लागतो. मात्र या आजारातून बरं होऊनही अनेक स्त्रिया नैराश्याचं जीवन जगतात. पण, आता तसं होणार नाही. कारण, कृत्रिम पद्धतीने बनवलेल्या स्तनांचा पर्याय अनेक रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

स्तनांच्या कर्करोगावर करण्यात आलेल्या ऑपरेशनमुळे घराबाहेर पडताना नोकरदार महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा महिलांना सामान्य व्यक्तीप्रमाणे आपलं जीवन जगता यावं, या उद्देशाने मुंबईच्या परळमधील इंडियन कॅन्सर सोसायटी मोलाची कामगिरी बजावत आहे.

'इंडियन कॅन्सर सोसायटी'मार्फत स्तनांचा कर्करोग झालेल्या महिलांसाठी कृत्रिम स्तन पुरवले जातात. या आणि अशा अनेक कृत्रिम अवयवांची मुंबईतूनच नाही, तर पुणे, नागपूरमधूनही मागणी करण्यात येते. विशेष म्हणजे कर्करोगावर मात केलेल्या महिलाच हे कृत्रिम स्तन बनवतात. त्यांना हरवलेला आत्मविश्वास परत मिळावा, हाच यामागचा उद्देश असल्याचं इथल्या डॉक्टरांनी सांगितलं.


कृत्रिम स्तनांचे प्रकार

कापूस आणि रबर या दोन प्रकारांमध्ये कृत्रिम स्तन बनवण्यात येतात. लायक्रा नावाच्या मटेरिअलमध्ये कापूस किंवा रबर भरून हे कृत्रिम स्तन तयार केले जातात. कापसापासून बनवलेल्या (कॉटन स्टोम) कृत्रिम स्तनांची अंदाजे किंमत २५० ते ४०० रुपये असते. तर, रबराच्या (लेटेक्स) कृत्रिम स्तनांची किंमत अंदाजे ५०० रुपये आहे. या स्तनांसाठी विशिष्ट रचना असलेली ‘ब्रा’ वापरावी लागते. एक महिला हे कृत्रिम स्तन ३ ते ६ महिने वापरु शकते.


कृत्रिम स्तनांना मुंबई, पुणे, जयपूर, नागपूर या शहरातून अधिक मागणी आहे. गेल्या काही वर्षांत १ लाखांहून अधिक महिलांना कृत्रिम स्तन पुरवण्यात आले आहेत. दररोज साधारणतः १० ते १२ कृत्रिम स्तनांची मागणी येत असते.

डॉ. सुलक्षणा पेडणेकर, इंडियन कॅन्सर सोसायटी


कर्करोगावर मात केलेले रुग्णच सध्या कर्करोगग्रस्तांना मार्गदर्शन करतात. तसेच या महिलाच कृत्रिम अवयव बनवण्याचे काम करतात. या रुग्णांना संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो.

डॉ. वंदना धामणकर, सहाय्यक संचालक, इंडियन कॅन्सर सोसायटीहेही वाचा

'त्या' दिवसांत महिलांना सुट्टीची खरंच गरज आहे का?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.