Advertisement

चिंताजनक! महाराष्ट्रातील ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे

केंद्राने देखील गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील नमुने हे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याचं स्पष्ट केलं होतं.

चिंताजनक! महाराष्ट्रातील ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे
SHARES

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) तपासलेल्या एकूण नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुने (३६१ पैकी २२०) हे कोरोना विषाणूच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’ (double mutation E484Q and L452R of the coronavirus, identified under the B.1.617 lineage) चे असल्याचं पुढं आलं आहे. हे नमुने जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान राज्यातील विविध भागातून घेण्यात आले होते. 

तर केंद्राने देखील गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के नमुने हे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढण्यामागचं हेच कारण असेल, हे खात्रीने सांगता येणार नाही, असंही सांगितलं होती. 

एनआयव्ही आणि एनसीडीसीकडे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यानुसार जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर हाती आलेला अहवाल राज्य सरकारच्या प्रयोगशाळांना दाखवण्याची तयारी राष्ट्रीय विषाणू संस्थेने दाखवली आहे. तसंच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी देखील त्यासंबंधीचा अहवाल राज्याला देण्याची विनंती केंद्राकडे केली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळून येत आहेत. राज्यात दिवसाला सरासरी ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येण्यामागे  ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून लावला जात आहे. 

हेही वाचा- मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे!, फडणवीसांचा ठाकरे सरकारला टाेला

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रा (NCDC) चे संचालक डाॅ. सुजित सिंह यासंदर्भात म्हणाले की, विविध जिल्ह्यातून गोळा करण्यात आलेले हे नमुने अत्यंत कमी आहेत. या नुमन्यांच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढू शकत नाही. हा डबल म्युटंट स्ट्रेन दिल्लीतही आढळून आला होता. सध्या हाती आलेले नमुने हे १ टक्का देखील नाहीत, त्यामुळे हाच स्ट्रेन रुग्णवाढीला कारणीभूत असेल, असा दावा सध्या तरी करता येणार नाही. 

एनआयव्हीच्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये ठाणे आणि अकोल्यात कोरोनाचा हा डबल म्युटंट स्ट्रेन  (B.1.617) आढळून आला हाेता. फेब्रुवारीमध्ये अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ इ. जिल्ह्यातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला. या जिल्ह्यातून प्रत्येकी १० ते ३० नमुने घेण्यात आले होते. 

अमरावती आणि अकोल्यात कोरोनाच्या या स्ट्रेनचा प्रभाव जाणवतो. अकोल्यातील ८५.२ टक्के (३४ पैकी २७) नमुन्यात हा स्ट्रेन आढळून आला आहे. तर अमरावतीतील ६९.३ टक्के (९८ पैकी ६८) नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे.  

टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोनाच्या या नव्या लाटेत संपूर्ण कुटुंब प्रभावित होताना दिसत आहे. हा नवा स्ट्रेन अत्यंत वेगाने पसरणारा आहे. या स्ट्रेनची परिपूर्ण माहिती होण्यासाठी जिल्हानिहाय त्याचा अभ्यास करावा लागेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा