Advertisement

मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 16 दिवसांवर

मुंबईकरांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत रुग्ण वाढण्याचा वेग मंदावत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 16 दिवसांवर
SHARES
मुंबईकरांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. संपूर्ण मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी आता 13 दिवसांवरुन 16 दिवसांवर गेला आहे. म्हणजेच मुंबईत रुग्ण वाढण्याचा वेग मंदावत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी वाढण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील 43 टक्के इतके झाले आहे.

महापालिकेच्या 24 पैकी 6 विभागांमध्ये कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 20 दिवसांवर गेला आहे. यामध्ये हॉटस्पॉट म्हणून ओळख बनलेल्या जी/दक्षिण (वरळी)  जी/उत्तर (धारावी) एम/पूर्व विभाग (मानखूर्द) या विभागांचा समावेश आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कोरोना समर्पित रुग्णालये, आरोग्य केंद्र आदी मिळून आजपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 43 टक्के रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

रुग्ण दुपटीच्या सरासरी 16 दिवसांच्या तुलनेत काही विभागांनी त्याहून जास्त चांगली कामगिरी केली आहे.  डी विभाग (नाना चौक ते मलबार हिल) 19  दिवस, ए विभाग (कुलाबा ), एल विभाग (कुर्ला ) 17 दिवस, के/पश्चिम (अंधेरी)18 दिवस, बी विभाग (मशिद मंदीर ) 16  दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूदर देखील यापूर्वीच नियंत्रणात आला आहे. सध्या तो 3.2 टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे.



हेही वाचा -

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या ९० सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा