Advertisement

मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ४१ दिवसांवर

मुंबईमध्ये ११ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मुंबईत सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे.

मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ४१ दिवसांवर
SHARES

मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधी आता ४१ दिवसांवर पोहोचला आहे.  हा कालावधी ५० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले असून, त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना वाढवल्या आहेत.

मुंबईत रुग्ण रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६ जून रोजी ३० दिवस होता. पालिकेच्या माध्यमातून `चेस द व्हायरस’ मोहिमेंतर्गत रुग्णांचा घेण्यात येणारा शोध आणि रुग्णामागे १५ जणांचे क्वारंटाइ,  प्रभावी औषधोपचार, निर्जंतुकीकरण मोहीम यामुळेच रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आता रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आज ४१ दिवसांवर गेला आहे.

मुंबईमध्ये ११ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मुंबईत सातत्याने करोनाचा संसर्ग वाढतच आहे. मुंबईत २२ मार्च रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा काळ तीन दिवस होता. १५ मार्च रोजी तो पाच दिवस झाला. १२ मे रोजी तो १० दिवसांवर गेला. हा कालावधी २ जून रोजी २० दिवस, १६ जून रोजी ३० दिवस आणि २४ जून रोजी ४१ दिवसांवर पोहोचला आहे. 

मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन १.८१ टक्के झाला आहे.  मुंबईतील वॉर्डचा विचार केल्यास सर्वात कमी दैनंदिन वाढ एच पूर्व ०.७ टक्के, एफ उत्तर  ०.८ टक्के, ई ०.९ टक्के इतकी खाली आली आहे. यामध्ये २४ पैकी १७ वॉर्डमधील दैनंदिन वाढ 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी

परिसर                दिवस

वांद्रे पूर्व                ९७

माटुंगा परिसर      ९१

भायखळा              ७६

कुर्ला                     ७३

फोर्ट-कुलाबा         ६९



हेही वाचा -

Mission Zero: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मिशन झिरो' मोहीम

Coronavirus Pandemic: मुंबईत २१४१ रुग्णांची कोरोनावर मात, ५८ जणांचा दिवसभरात मत्यू




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा