Advertisement

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५८ दिवसांवर

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला होता. बहुतांशी भागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये घट होत होती. मात्र, आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५८ दिवसांवर
SHARES

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला होता. बहुतांशी भागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये घट होत होती. मात्र, आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ वरून ५८ दिवसांवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ८४ दिवसांवर आला होता. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू ल्यानंतर मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ७०० ने वाढणारी रुग्णसंख्या आता दोन हजारांनी वाढत आहे. बोरिवली, गोरेगाव, दहिसर, मुलुंड, ग्रॅन्टरोड—मलबार हिल या भागात सर्वाधिक वेगाने रुग्ण वाढत आहेत. मालाड, बोरिवली, अंधेरीतील एकूण रुग्णांची संख्या प्रत्येकी दहा हजारापर्यंत पोहोचू लागली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.२० टक्के झाला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या अकरा दिवसांतच १८ हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.  उपचाराधीन रुग्णांचा आकडाही २७ हजारांच्यापुढे गेला आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही ७८ टक्के झाली आहे.

हेही वाचा - 

Maratha Reservation: सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं, पण…

मराठा आरक्षणासाठी लढा देतच राहू- अशोक चव्हाण


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा