Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १०२ दिवसांवर

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये वाढलेली रुग्णसंख्या आता घटत आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी प्रथमच १०२ दिवसांवर गेला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १०२ दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये वाढलेली रुग्णसंख्या आता घटत आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी प्रथमच १०२ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत ऑगस्टमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ दिवस होता, मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरूवात झाली होती. सप्टेंबरपासून रोज २ हजारांच्या वर रुग्ण आढळत होते. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटल्याचं दिसून येत आहे.  

रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस जेवढे अधिक तेवढे चांगले मानले जाते. मुंबईतील २४ पैकी ३ विभागांत रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल १५० दिवसांपेक्षा अधिक आहे. तर ११ विभागांमध्ये हा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. वरळी, प्रभादेवीमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वाधिक १७५ दिवस आहे.  तर भायखळ्यामध्ये १६० दिवस, आणि परळ – शिवडीमध्ये १५७ दिवस आहे.

बुधवारी मुंबईत १,६०९ नवीन रुग्ण आढळले. तर ८९४ रुग्ण बरे झाले. मुंबईत आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १९,२४५ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर आतापर्यंत ९८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा