Advertisement

नवी मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवर

नवी मुंबईतील रुग्णदुपटीचा काळ मुंबई, ठाणे, पनवेल शहरांपेक्षा जास्त आहे. येथील रुग्णसंख्या मागील आठ दिवसांपासून घटत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांतही घट होत आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवर
SHARES

 नवी मुंबईतील कोरोना आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी आता १११ दिवसांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा कालावधी ४५ दिवस होता.

येथील रुग्णसंख्या मागील आठ दिवसांपासून घटत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांतही घट होत आहे. नवी मुंबईतील रुग्णदुपटीचा काळ  मुंबई, ठाणे, पनवेल शहरांपेक्षा जास्त आहे.  मुंबईत ७१ दिवस, ठाणेमध्ये  ८८ दिवस आणि पनवेलमध्ये १०१ रुग्ण दुपटीचा कालावधी आहे.

नवी मुंबईत मे महिन्यात कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ११ दिवसांवरून फक्त सहा दिवसांवर खाली आला होता. मात्र, आता तो १११ दिवसांवर गेल्याने दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत गणेशोत्सवापासून  कोरोना रुग्णांची संख्या मोठी वाढली. परंतु आता ही संख्या नियंत्रणात आहे. पालिकेने आरोग्य सुविधांत दुपटीने वाढ केली आहे. कोरोना उपचारांसाठी मागील तीन महिन्यांत खाटांची संख्या दुप्पट झाली असून चाचण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढवलेली आहे. 

नवी मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४१,३८३ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८३६ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३०१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९० टक्के झाला आहे. 



हेही वाचा- 

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३४८ रुग्ण



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा