Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० दिवसांवर

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. तसंच रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. तसंच रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३०० दिवसांवर गेला आहे. महापालिकेच्या २४ विभागांमध्ये सी विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ८०९ दिवसांवर पोहोचला आहे. तर ई, बी, एफ-दक्षिण आणि जी-उत्तर या ४ विभागांमध्ये हा कालावधी ५०० दिवसांचा आहे.

मुंबईत सध्या रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील सातत्याने घट होत आहे. सध्या मुंबईत ११ हजार ५५७ एवढे सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

 महापालिका क्षेत्रातील व्यवसायिकांची कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात तसेच हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक यांच्या कोरोना चाचण्या नियमितपणे करण्यात येणार आहेत. या चाचणीदरम्यान बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. तसंच विलगीकरण करणे, समुपदेशन करणे इत्यादी पर्यायदेखील करण्यात येत आहे.



हेही वाचा -

काशीमिरात ४ वर्षांच्या मुलीचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा