Advertisement

नवी मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४५४ दिवसांवर

दिवाळीपूर्वी शहरात रुग्ण दुपटीचा कालावधी ११ नोव्हेंबर रोजी ३५२ दिवसावर गेला होता. मात्र दिवाळीनंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.

नवी मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४५४ दिवसांवर
SHARES

नवी मुंबईतील कोरोना आता नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून येथील रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्ण    दुपटीचा कालावधी आता तब्बल ४५४ दिवसांवर गेला आहे. 

दिवाळीपूर्वी शहरात रुग्ण दुपटीचा कालावधी ११ नोव्हेंबर रोजी ३५२ दिवसावर गेला होता. मात्र दिवाळीनंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.  त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता.  मात्र, आता रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी ४५४ दिवस म्हणजे एक वर्ष तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५२ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ७६७ झाली आहे.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७,७०५ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०१९ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १०४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी

१५ ऑगस्ट : ४५ दिवस

१५ सप्टेंबर : ६७ दिवस

 १५ ऑक्टोंबर : १११ दिवस

१५ नोव्हेंबर :  ३५२ दिवस

१५ डिसेंबर : ४५४ दिवस



हेही वाचा -

संजय गांधी नॅशनल पार्क पर्यटकांसाठी पुन्हा खुले, पण 'या' आहेत अटी

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, शहरातील सर्वाधिक खराब एक्यूआयची नोंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा