Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर

मुंबईत सप्टेंबरपासून वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग एक टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर
SHARES

मुंबईत सप्टेंबरपासून वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग एक टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ७१ दिवसांवर आला आहे.

सोमवारी आणि मंगळवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मंगळवारी १३२५ नवीन रुग्ण आढळले. तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी २३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या २,३२,३९५ वर गेलेली आहे. यापैकी १,९८,१२७ म्हणजेच ८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या २१,८४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुूंबईत महिन्याभरापासून रोज ४० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. संख्याही कमी झाल्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. मृतांची एकूण संख्या आतापर्यंत ९५०४ झाली आहे. मुंबईतील चाचण्यांची संख्या २० हजारापर्यंत वाढवण्याचे पालिका आयुक्तांनी निर्देश दिलेले असले तरी गेल्या दोन दिवसांपासून फक्त नऊ हजार चाचण्या होत आहेत. त्यामुळेही रुग्णांची एका दिवसातील संख्या कमी नोंदली गेल्याची शक्यता आहे.



हेही वाचा

 NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा