Advertisement

ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर

ठाणे महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढून ९० टक्क्यांवर गेलं आहे.

ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढून ९० टक्क्यांवर गेलं आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही वाढून ७७ दिवस झाला आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी  ६९ दिवस होता. तो आता ७७ दिवसांवर पोहोचला आहे.

पालिका क्षेत्रातील मृत्युदरही २.७८ टक्क्य़ांवरून २.५६ टक्क्यांवर आला आहे.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. पालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढू लागली. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ६० दिवसांवर आला.

गेल्या काही दिवसांपासून त्यामध्येही सुधारणा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी आता ६९ दिवसांवर आला होता. तर, आता रुग्ण दुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४४ हजार ९३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३९ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत, तर १,११० जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी  रोज अडीच हजार चाचण्या करण्यात येत होत्या. यामध्ये सरासरी दोनशे रुग्ण आढळून येत होते. परंतु आता पाच हजारांहून अधिक चाचण्या होत आहेत. यामध्ये रोज सरासरी तीनशे ते साडेतीनशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून येत आहे. 



हेही वाचा -

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा