Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३ महिन्यांवर

मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. सप्टेंबरमध्ये रोज २ हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते. आता ही रुग्णसंख्या घटू लागली आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३ महिन्यांवर
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा घटू लागली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३ महिन्यांवर गेला आहे.

मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. सप्टेंबरमध्ये रोज २ हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते. आता ही रुग्णसंख्या घटू लागली आहे. मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. रविवारी १६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी  १२३३ नवे रुग्ण आढळले. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार १७२ इतकी झाली आहे. तर २ लाख १२ हजार ९०५ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मुंबईत १८,०६२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

मुंबईत आतापर्यंत १३,५४,१८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. दर दिवशी १६ ते २० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य दिलेले असताना सध्या दिवसभरात १५ हजारांपर्यंत चाचण्या होत आहेत.  मुंबईत मशीद बंदर, भेंडीबाजार, डोंगरी, पायधुनीचा भाग असलेल्या बी विभागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. या भागातील एकूण रुग्णांची संख्या दोन हजारांच्याही आत आहे.

बी विभागात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या सहा महिन्यांत सर्वात कमी राहिली आहे. मुंबईतील अन्य भागांमध्ये दररोज १०० ते दीडशे रुग्ण आढळत असताना ‘बी’ विभागात मात्र रोज केवळ १० ते २० रुग्णांची नोंद होत आहे.



हेही वाचा -

मस्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा