Advertisement

मिरा-भाईंदर पालिका रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढ होत आहे. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.

मिरा-भाईंदर पालिका रुग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढ होत आहे. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या इंदिरा गांधी प्रसूतिगृह व रुग्णालयात काम करत असलेल्या अकरा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयातील ७ परिचारिका, १ डायलिसिस तंत्रज्ञ, १ सेवक व २ सेविका अशा ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मीरा-भाईंदर शहरात पंडित भीमसेन जोशी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतिगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे कोविड रुग्णालय केल्याने त्यामधील प्रसूतिगृह बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी गांधी रुग्णालयात महिलांची संख्या वाढली आहे.  डायलिसिस व बाह्योपचारसाठी दैनंदिन रुग्णसुद्धा वाढले आहेत. परंतु या रुग्णांची कोरोना चाचणी केली गेलेली नसताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांनादेखील आवश्यक सुरक्षा साहित्य दिले जात नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

मागील आठवडाभरापासून मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. एका आठवड्यातच ६३२ नवीन रुग्ण आढळलं आहेत. लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत गेली असल्याचं समोर आलं आहे. ८ जून रोजी येथील रुग्ण संख्या ही  १०२१ होती. मात्र, अवघ्या सात दिवसात १५ जून रोजीच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या १६५३ वर गेली आहे. 



हेही वाचा -  

मुंबई महापालिकेला मिळणार ८५ नव्या रुग्णवाहिका

Coronavirus Updates: उबर अॅपवरून बुक करा रुग्णवाहिका




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा