जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमानवर उपचार सुरू

चर्नीरोड - जगातील सगळ्यात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमान अहमद हिला शनिवारी उपचारासाठी मुंबईत आणले गेले. 500 किलो वजन असलेल्या 36 वर्षीय इमानला हलवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला होता. इमानसाठी सैफी रुग्णालयात सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. सध्या चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात तिचे वजन कमी करण्यासाठीचे उपचार सुरु आहेत. इमानवर करण्यात येणाऱ्या बेरिएट्रीक शस्त्रक्रियेनंतर इमानला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

इमानवर बेरिएट्रीक शस्त्रक्रिया एका महिन्यानंतर करण्यात येणार आहे. त्यासाठी 13 हून अधिक डॉक्टरांची टीम तिची देखभाल करत आहे. या पहिल्या पद्धतीत 150 ते 200 किलो वजन कमी होण गरजेचं आहे, मात्र त्यानंतर 2 वर्षांनंतर दुसरी पद्धत वापरली जाणार आहे

इजिप्तहुन मुंबईत तिला आणण्यासाठी आता पर्यंत 80 लाख रुपये खर्च आला आहे. इमानचे बॉडी मासइंडेक्स 252 असून जडपणा सोबतच हायपर टेन्शन. मधुमेह यांसारख्या व्याधीही जडल्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांसाठी इमानवर उपचार करणं हे एक आव्हान आहे. तसंच तिच्या बहिणीने काही दिवसांपूर्वी ट्विटरव्दारे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत स्वराज यांनी भारतात येण्यासाठी वैद्यकीय व्हिसा देऊ केला होता.

Loading Comments