Advertisement

अायुषमान भारत! अार्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचारांसाठी दरवर्षी ५ लाख रूपये मिळणार


अायुषमान भारत! अार्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचारांसाठी दरवर्षी ५ लाख रूपये मिळणार
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अाज २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आरोग्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात दोन महत्त्वाच्या योजना करण्यात आल्या आहेत. 'आयुषमान भारत' आणि 'नवीन आरोग्य केंद्र' या दोन महत्त्वाच्या योजना सुरू करणार असल्याची घोषणा अरुण जेटली यांनी केली आहे. 'आयुषमान भारत' या योजनेचा फायदा ५० कोटी नागरिकांना होणार आहे. त्याचबरोबर क्षयरोग रोखण्यासाठी अर्थसंकल्पात ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच क्षयरोगींना महिन्याला ५०० रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अार्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी उपचारांकरिता ५ लाख रुपये मिळणार अाहेत.


२४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये

देशभरात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक मोठे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. १० कोटी गरीब कुटुंबांसाठी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली असून ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असेल आणि त्याचा फायदा ५० कोटी लोकांना होणार असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे.


४० टक्के लोकांसाठी स्वास्थ विमा

अार्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रूपये मिळणार असून देशातील 40 टक्के लोकांना स्वास्थ विमा उपलब्ध होणार अाहे. ५.२२ कोटी कुटुंबांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला असल्याचंही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा - 

बजेट २०१८चं प्रत्येक अपडेट

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अाणि गव्हर्नरचे पगार वाढणार

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आर्थिक संकटाचे सावट!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा