Advertisement

‘एफडीए’ ई सिगरेटवर बॅन घालण्याच्या तयारीत

राज्यात यापूर्वी गुटख्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता ‘एफडीए’ ई सिगरेटवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

‘एफडीए’ ई सिगरेटवर बॅन घालण्याच्या तयारीत
SHARES

राज्यात यापूर्वी गुटख्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता ‘एफडीए’ ई सिगरेटवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. ‘एफडीए’ने इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टमच्या (ईएनडीएस) विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घएतला आहे. तसंच यावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे प्रस्तावदेखील पाठवण्यात येणार आहे.


आठवड्याभरात प्रस्ताव

राज्य सरकारकडून ई सिगेरटवर बंदी घालण्याची मान्यता मिळाल्यानंतर त्वरित त्या बंद करण्यात येणार असल्याची माहिती ‘एफडीए’च्या आयुक्तांनी दिली. तसंच यासाठी आठवड्याभरात एक प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्रीय कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाकडून गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ई सिगरेट्सशी निगडीत कोणत्याही वस्तूची विक्री, निर्मिती, व्यापार करण्यावर देशभरात बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या आधारे आता ‘एफडीए’ हा प्रस्ताव तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

भारतात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात १०६ दशलक्ष लोक धुम्रपान करतात. या श्रेणीत चीन नंतर भारताचा क्रमांक येतो. ‘एफडीए’नं घेतलेल्या या निर्णयाचं आरोग्य तज्ज्ञांनीही स्वागत केलं आहे.




हेही वाचा -

मोनोच्या चालकांना मिळणार वैमानिकांसारखं ट्रेनिंग!

शिवडीमध्ये महापालिका उभारणार समाज कल्याण केंद्र



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा