Advertisement

मोनोच्या चालकांना मिळणार वैमानिकांसारखं ट्रेनिंग!

नव्यानं नियुक्ती करण्यात आलेल्या मोनोच्या चालकांना वैमानिकांसारखंच ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यासाठी एक सिम्युलेटर उभारण्यात आलं असून त्याद्वारे मोनोच्या संचालन आणि नियंत्रणाचं ट्रेनिंग देण्यात येईल.

मोनोच्या चालकांना मिळणार वैमानिकांसारखं ट्रेनिंग!
SHARES

नव्यानं नियुक्ती करण्यात आलेल्या मोनोच्या चालकांना वैमानिकांसारखंच ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यासाठी एक सिम्युलेटर उभारण्यात आलं असून त्याद्वारे मोनोच्या संचालन आणि नियंत्रणाचं ट्रेनिंग देण्यात येईल.

आर्टिफिशल ड्रायव्हर केबिन

हे सिम्युलेटर वैमानिकांसाना प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशल ड्रायव्हर केबिनप्रमाणे असेल. यासाठी एमएमआरडीए तब्बल ६ कोटी रूपये खर्च करणार आहे. थेट मोनोमध्ये प्रशिक्षण देणं शक्य नसल्यानं अशा प्रकारचा उपक्रम एमएमआरडीए राबवणार आहे. यापूर्वी मोनोच्या चालकांना चेंबूर ते वडाळा या मार्गावर प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

अमेरिका, चीनला रस

अमेरिका, चीन सारख्या देशांनी अशा प्रकारचं सिम्युलेटर उभारण्यात रस दाखवला असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. हे सिम्युलेचर वडाळा डेपो मार्गावर उभारण्यात येणार आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये मोनोची सेवा ३ शिफ्टमध्ये सुरू करण्यावरही मोनो प्रशासन विचार करत आहे.

हेही वाचा -

वांद्रे पूर्वेकडील स्कायवॉक राहणार ३ महिने बंद

'तुमचा पाळणा कधी हलणार'?, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा