Advertisement

रासायनिक रंगांवर एफडीएची नजर


रासायनिक रंगांवर एफडीएची नजर
SHARES

मुंबई - होळी हा सण जवळ आलाय. त्यामुळे आता बाजारही रंगांनी फुलला आहे. पण हो, रंगांची खरेदी करताना जरा सावधान. रासायनिक रंग टाळत नैसर्गिक रंगाचा वापर करा. कारण बाजारात रायासनिक रंग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अशा रंगाचा वापर आरोग्यास अपायकारक ठरतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे एफडीएने यंदाही रासायनिक रंगांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अन्न निरीक्षक बाजाराची तपासणी करत रंगांचे नमुने घेत असल्याची माहिती एफडीएच्या सहआयुक्त (औषध) बृहन्मुंबई विनिता थॉमस यांनी दिली आहे.

दरवर्षी, एफडीए रासायनिक रंगांवर नजर ठेवते, पण एफडीएकडून अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एफडीए आपल्या कायदेशीर मर्यादेचा पाढा वाचत हात वर करताना दिसते. एफडीएच्या म्हणण्यानुसार रंग हे औषध वा सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोडत नाही. त्यामुळे एफडीएला थेट रंगांविरोधात कारवाई करता येत नाही वा कारवाई करण्याचे अधिकारही एफडीएला नाही. त्यामुळे दरवर्षी केवळ नमुने घेण्याचेच काम एफडीएकडून होते. दरम्यान एफडीएने रासायनिक रंग टाळत नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आरपीवाय राव यांनी मात्र एफडीए आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप केला आहे. रासायनिक रंगांविरोधात एफडीएला कारवाई करता येते पण जाणीवपूर्वक एफडीएही जबाबदारी टाळत आहे. रासायनिक-विषारी रंगामुळे त्वचेवर पुरळ, रॅशेस येणे, डोळ्यात रंग गेल्याने डोळे गमवावे लागणे अशा भयानक घटना घडतातच. पण या रंगांचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे यामुळे कर्करोग होण्याचीही शक्यता दाट असते. त्यामुळे एफडीए आणि पालिकेच्या संबंधित विभागाने जागे होत विषारी रंग तयार करण्याऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचेही राव यांन स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा