Advertisement

मुंबईत धावली पहिली व्हिलचेअर बाईक अॅम्ब्युलन्स

मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. या सेवेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या सेवेची गरज असून सर्व सुविधांनी युक्त अशी बाईक अॅम्ब्युलन्स नक्कीच फायदेशीर ठरेल, असं मत व्यक्त केलं.

मुंबईत धावली पहिली व्हिलचेअर बाईक अॅम्ब्युलन्स
SHARES

व्हिलचेअर आणि आॅक्सिजन सिलिंडर असणारी मुंबईतली पहिली बाईक अॅम्ब्युलन्स १ मे रोजी रुग्णांच्या सेवेत रूजू झाली. रुग्णांना तत्काळ प्राथमिक उपचार मिळावेत म्हणून लोढा फाऊंडेशनतर्फे ही बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली आहे. याआधी शिवसेनेने १० बाईक अॅम्ब्युलन्स सुरू केल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. या सेवेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या सेवेची गरज असून सर्व सुविधांनी युक्त अशी बाईक अॅम्ब्युलन्स नक्कीच फायदेशीर ठरेल, असं मत व्यक्त केलं.

'या' आहेत सुविधा

आपात्कालीन स्थितीत रुग्णाला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडरसह हृदय, रक्तदाब तपासणी यंत्रासह नाडी, साखर तपासणीची सुविधाही उपलब्ध आहे. या रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाइन क्रमांक १२७८ असा आहे.हेही वाचा-

रुग्णाच्या डोळ्याला उंदराचा चावा, ट्रॉमा रुग्णालयातील प्रकार

उन्हाचा पारा वाढला, त्वचा सांभाळासंबंधित विषय
Advertisement