Advertisement

त्याला होता चौथ्या स्टेजचा कॅन्सर..तरी तो वाचला!

५८ वर्षीय रुग्णाला चौथ्या लेव्हलच्या कॅन्सरपासून वाचवत त्याला जीवनदान देण्यात रुग्णालयाला यश आले आहे. ज्यामुळे हा रुग्ण आता आणखी काही काळ जगू शकणार आहे. झायनोवा रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञांनी कोलोनचा कॅन्सर चौथ्या लेव्हलवर असणाऱ्या या रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याला हे जीवदान दिलं आहे.

त्याला होता चौथ्या स्टेजचा कॅन्सर..तरी तो वाचला!
SHARES

तिसऱ्या लेव्हलचा कॅन्सर झालेला रुग्ण जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत जगू शकतो. तर चौथ्या लेव्हलचा कॅन्सर झालेल्या रुग्णाला बरा करणं हे डॉक्टरांसमोरील मोठं आव्हान असतं. पण घाटकोपरच्या झायनोवा रुग्णालयाने एका ५८ वर्षीय रुग्णाला चौथ्या लेव्हलच्या कॅन्सरपासून वाचवत त्याला जीवनदान दिले आहे. ज्यामुळे हा रुग्ण आता आणखी काही काळ जगू शकणार आहे. झायनोवा रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञांनी कोलोनचा कॅन्सर चौथ्या लेव्हलवर असणाऱ्या या रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याला हे जीवदान दिलं आहे.


कोलोन कॅन्सर म्हणजे?

कोलोन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांचा कॅन्सर. मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव. ज्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला कचरा किंवा मल साठलेला असतो. मोठ्या आतड्यांचा कर्करोग हा आतड्यांच्या आतील आवरणांपासून सुरू होतो आणि तिथून पुढे पसरतो. अनेकदा मोठ्या आतड्यांमध्ये छोट्या छोट्या गाठी आढळून येतात. असाच आतड्यांचा (कोलोन) कॅन्सर शहापूरच्या एका व्यक्तीला झाला.


लेप्रोस्कोपिकद्वारे बायपास शस्त्रक्रिया

या रुग्णावर दीड वर्षापूर्वी फोर्टिस रुग्णालयातही लेप्रोस्कोपिकद्वारे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. पण, महिन्याभरापूर्वी पुन्हा पोटात वेदना जाणवू लागल्यानं अनेक डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. पण काहीच फरक पडला नाही. शेवटी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घाटकोपरच्या झायनोवा रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. या अहवालात पोटात पुन्हा एका ठिकाणी कॅन्सर आढळून आला. हा कॅन्सर चौथ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात होता. इतकंच नव्हे, तर पोटातील सर्व भागात आणि आतड्यांमध्ये हा कॅन्सर पसरला होता. याला वैद्यकीय भाषेत ‘पेरीटोनियल कॅर्सिनोमोटिस’ असं म्हणतात.


डॉक्टरांनी वापरली एचआयपीईसी पद्धत

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पेरिटोनियल कॅर्सिनोमोटिस’ कॅन्सर या शेवटच्या टप्प्यात असताना उपचार करणं खूपच अवघड असतं. अशात केमोथेरेपी देऊन रुग्ण कमीतकमी १२ महिने जगू शकतो. पण, डॉक्टरांनी एचआयपीईसी म्हणजेच (Heated Intraperitoneal Intra-operative Chemotherapy) केली. ज्यात शस्त्रक्रिया केल्यानंतर ९൦ मिनिटे झाल्यावर पोटात केमोथेरेपी दिली जाते.

याविषयी 'मुंबई लाइव्ह'ला अधिक माहिती देताना झायनोवा रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अमित गांधी यांनी सांगितलं की, ‘कर्करोग असल्याचं निदान झाल्यावर रुग्ण अक्षरशः खचून गेलेल्या अवस्थेत आमच्याकडे येतो. परंतु, दोनदा कर्करोगाशी झुंज देतानाही हा व्यक्ती अतिशय फिट होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं करणं, हे आमच्यापुढे आव्हान होतं. सुरुवातीला आम्ही त्यांची पेटस्कॅन टेस्ट केली. त्यामुळे कळलं की कॅन्सर पोटातील सर्व भागात आणि लहान - मोठ्या आतड्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळे, आम्ही त्यांच्यावर साइटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया आणि हाइपरथर्मिक इंट्रा पेरिटोनियम किमोथेरेपीद्वारे उपचार करण्याचं ठरवलं’.

ही शस्त्रक्रिया करण्यासाठी नातेवाईकांची परवानगी घेतली. डॉक्टरांवर विश्वास टाकून ही शस्त्रक्रिया करण्यास नातेवाईकांनी परवानगी दिली. त्यानुसार, ६ मार्च २൦१८ रोजी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल १२ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अमित गांधी यांच्यासह डॉ. विजय ओगले आणि डॉ. यतिन खैरनार यांच्या चमूनं ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

साइटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया ही खूपच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. साधारणतः शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किमोथेरेपी दिली जाते. परंतु, यात पोटाची चिरफाड करून कॅन्सर पूर्णतः काढून टाकावा लागतो. कॅन्सरचा एक कण जरी पोटात राहिला, तर पुन्हा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थितपणे हा कॅन्सर पोटातून काढावा लागतो. पण, या प्रकरणात कॅन्सर लहान आणि मोठ्या आतड्यांमध्येही पसरला होता. त्यामुळे, पोटाला चीर देऊन कॅन्सर काढण्यात आला. त्यानंतर मशिनद्वारे ४३ डिग्री सेल्सिअसवर थेट पोटात किमोथेरेपी देण्यात आली’, असंही डॉ. गांधी यांनी सांगितलं.



हेही वाचा

जे.जे. रुग्णालयात कॅन्सर ओपीडी सुरू


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा