Advertisement

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत अँटीजेन चाचण्या

मागील पाच दिवसांपासून रोज दोनशे ते अडीचशे नागरिक अॅन्टीजेन चाचण्या करून घेत आहेत. यामधून चार ते पाच कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत अँटीजेन चाचण्या
SHARES

आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. लोकमान्य टिळक, केईएम, नायर या पालिका रुग्णालयांमध्ये आता कोरोनाच्या चाचण्या विनाशुल्क करून देण्यात येत आहेत.


अॅन्टीजेन पद्धतीने कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मागील पाच दिवसांपासून रोज दोनशे ते अडीचशे नागरिक अॅन्टीजेन चाचण्या करून घेत आहेत. यामधून चार ते पाच कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. 


केईएम, लो. टिळक, नायर, कूपर या  पालिका रुग्णालयांमध्ये सकाळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी तर दुपारी सर्वसामान्यांसाठी अॅन्टीजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गरज असलेल्या रुग्णांच्या निश्चित निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्याही करून घेतल्या जात आहेत. काही नमुने कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. 

संसर्गाची सर्वाधिक शक्यता असणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण, इतर वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. पालिका रुग्णालयांतील या चाचण्यांचा लाभ मुंबईकरांनी घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीए



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा