Advertisement

'सॅनिटरी नॅपकिन्स रेशनवर फ्री द्या', छाया काकडेंंचं पुन्हा उपोषण


'सॅनिटरी नॅपकिन्स रेशनवर फ्री द्या', छाया काकडेंंचं पुन्हा उपोषण
SHARES

ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना रेशनवर मोफत सॅनिटरी नॅपकिन्स मिळावेत, या मागणीसाठी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानात सामाजिक कार्यकर्त्या छाया काकडे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

ग्रामीण भागात १൦ ते १५ किलोमीटर अंतरावर मेडिकल्स, मॉल्स उपलब्ध आहेत. मात्र, त्याचा खर्च हा ग्रामीण भागातील महिलांना न झेपण्यासारखा आहे. अवघ्या २५ रुपयांचे पॅकेट आणण्यासाठी तीस रुपये प्रवास खर्च लागतो. त्यामुळेच सॅनिटरी नॅपकिन्स रेशनिंगच्या दुकानावर मोफत द्यावं अशी मागणी घेऊन छाया काकडे आणि त्यांचे कार्यकर्ते मुंबईत उपोषणाला बसले आहेत.


प्रमुख मागण्या

० सॅनिटरी नॅपकिन रेशनिंगवर मोफत मिळावेत
० कर्करुग्ण महिलांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात
 माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात सॅनिटरी व्हेंडिंग मशिन्स द्याव्यात
 या गोष्टी जीआरप्रमाणे बंधनकारक करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी

गेल्यावर्षी आम्ही जीएसटी संदर्भात आंदोलन केलं होतं. बचतगटासाठी आज १२ टक्के जीएसटी लागत नाही. त्यासोबतच आम्ही या देखील मागण्या केल्या होत्या. पण, त्या पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून पुन्हा एकदा आम्ही उपोषणाला बसलो आहोत.


छाया काकडे, सामाजिक कार्यकर्त्या

महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनसंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारन पॅडमॅन या सिनेमाच्या माध्यमातून आवाज उठवला हे. त्यातून मोठी जनजागृती होणार असून आता छाया काकडे यांच्या उपोषणामुळे या मुद्द्यावर सरकार दरबारीही कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



हेही वाचा

आता ५ रूपयांत सॅनिटरी नॅपकिन्स, 'अस्मिता'ला मंत्रिमंडळाची मंजुरी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा