Advertisement

डोंबिवली-कल्याणच्या कोरोना रुग्णांवर वन रुपी क्लिनिकमध्ये विनामूल्य उपचार

तात्काळ उपचाराची गरज असेल आणि त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर ते डोंबिवलीतल्या वन रुपी क्लिनिकला भेट देऊ शकता.

डोंबिवली-कल्याणच्या कोरोना रुग्णांवर वन रुपी क्लिनिकमध्ये विनामूल्य उपचार
SHARES

वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी ट्विटरवर माहिती दिली की, कोरोनाव्हायरस बाधित कुठल्याही रुग्णाला तात्काळ उपचाराची गरज असेल आणि त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर ते डोंबिवलीतल्या वन रुपी क्लिनिकला भेट देऊ शकता. वन रूपी क्लिनिकची एक शाखा डोंबिवली पूर्वेला आहे.


घुले यांनी असंही म्हटलं आहे की, क्लिनिकमध्ये ऑक्सिजन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यासोबतच १०० खाटांची सुविधा उपलब्ध असून ती मोफत मिळू शकेल.

गेल्या काही महिन्यांत, वन रुपी क्लिनिकमधील स्वयंसेवकांनी COVID 19 मध्ये मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांमधील हजारो लोकांना त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. ठाणे, कल्याण आणि डोंबिवली इथं मोबाइल क्लिनिकद्वारे वन रुपी स्वसंसेवकांनी विनामूल्य स्क्रीनिंग केली होती. त्यानंतर कोरोनाव्हायरसची लक्षणे आढळलेल्यांना वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

दरम्यान, गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे ११ हजार ५१४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा ४ लाख, ७९ हजार ७७९ च्या घरातगेला आहे.

सध्या  ९ लाख ७६ हजार ३३२ नागरिक घरातच क्वारंटाईन आहेत. शिवाय, प्रयोगशाळेतील २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ६ ऑगस्टपर्यंत ४ लाख ७९ ७७९ नागरिक पॉझिटिव्ह आली आहेत. तथापि, मुंबईमध्ये गुरुवारी ९१० लोकांना कोरोनव्हायरसचं निदान झालं आणि एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार १५० वर गेली.



हेही वाचा

नवी मुंबईतील मॉल बंद करण्याचे आदेश, दुकान मालकांच्या आनंदावर विरजण

बापरे! ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेली १ लाखांच्या पुढे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा