Advertisement

मुंबईत स्वाइन फ्लूचा पहिला बळी

मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयात शनिवारी स्वाइन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दानिश्ताला ८ जुलै रोजी केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मुंबईत स्वाइन फ्लूचा पहिला बळी
SHARES

मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयात शनिवारी स्वाइन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरूणीचं नाव दानिश्ता खान (२६) असं असून ती गोवंडी इथं राहणारी आहे. दानिश्ताला ८ जुलै रोजी केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं. यंदाच्या पावसाळ्यातील स्वाइन फ्लूचा हा पहिला बळी आहे.

दानिश्तावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते.  स्वाइन फ्लू सोबतच तिला लेप्टोची लागण देखील झाली होती. उपचारांदरम्यान १३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली.

मुंबईत जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत २३७ रुग्णांची नोंद करण्यात असून ४ रुग्ण दगावले आहेत. तर राज्यभरात १९१ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. जानेवारी ते जुलै दरम्यान राज्यात १४ लाख २४ हजार ३५० रुग्ण तपासण्यात आले. त्यापैकी २२ हजार ३७६ संशयीत रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ७४५  रुग्णांना फ्लूची लागण झाल्याची नोंद आहे. यापैकी सध्या ८६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर १,४७० रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. 



हेही वाचा-

नायर रुग्णालयातील ३ निवासी डाॅक्टरांना मारहाण

महापालिकेकडून दिव्यांशचं पुन्हा शोधकार्य सुरू



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा