Advertisement

कोरोना व्हायरसनंतर हंताचा धोका

कोरोना विषाणूशी (Coronavirus) सुरू असलेल्या युद्धात सोमवारी चीनमधील युनान प्रांतातील एका व्यक्तीचा हंता विषाणूची (Hantavirus) लागण झाल्यानं मृत्यू ओढवला आहे.

कोरोना व्हायरसनंतर हंताचा धोका
SHARES

संपूर्ण जग आज कोरोना (Covid - 19) व्हायरसशी सामना करीत आहे. याची सुरुवात चीनमधील (China) वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर आज चीनमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक संकट कोसळलं आहे. 

कोरोना विषाणूशी (Coronavirus) सुरू असलेल्या युद्धात सोमवारी चीनमधील युनान प्रांतातील एका व्यक्तीचा हंता विषाणूची (Hantavirus) लागण झाल्यानं मृत्यू ओढवला आहे. हा व्यक्ती बसमधून शाडोंग प्रांतातून परतत होता. तो हंता पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्या ३२ प्रवाशांची पूर्ण चाचणी करण्यात आली. चीनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं या घटनेची माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूसारखाच हंता या साथीचा आजार होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.


हंता व्हायरस म्हणजे काय?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हंता व्हायरस कोरोना इतका घातक नाही. हा आजार उंदीर (Rat) किंवा खार यांच्या संपर्कात आल्यानं पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या म्हणण्यानुसार, 'उंदरांमुळे हंता विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. निरोगी व्यक्ती हंता विषाणूच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याचा धोका असतो.

हंता विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे जात नाही. परंतु जर एखाद्यानं उंदरांची विष्ठा, मूत्र इत्यादींना स्पर्श केल्यानंतर तो हात डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श केला तर हंता विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

काय आहेत लक्षणं?

हंता या विषाणूचा संसर्ग झाल्यास एखाद्याला ताप, डोकेदुखी, शरीरभर वेदना, पोटदुखी, उलट्या, अतिसार हा त्रास जाणवतो. उपचारास उशीर झाल्यास, संक्रमित व्यक्तीची फुप्फुसे पाण्यानं भरली जातात, त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. याची काही लक्षणं कोरोनासारखीच आहेत.


हंता विषाणू प्राणघातक आहे?

सीडीसीच्या मते, हंता व्हायरस प्राणघातक आहे. संक्रमित लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ३८ टक्के आहे. चीनमध्ये हंता विषाणूचे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा संपूर्ण जग वुहानपासून उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने झगडत आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १६ हजार ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे.


उपचार काय?

वैद्यकीय सेवा आणि आयसीयू हे दोन प्राथमिक उपचार या परिस्थितीत फायदेशीर आहेत. इतर बर्‍याच प्रकरणांमध्ये ऑक्सिजन थेरपी प्राप्त होते जी श्वसनाच्या समस्येत मदत करते.



हेही वाचा

हुशश! 'ते' १२ रुग्ण अखेर कोरोनामुक्त, डॉक्टरांच्या मेहनतीला यश

सर्दी, खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा