Advertisement

मुंबईत १ लाख खाटांची व्यवस्था करणार- टोपे

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 1 लाख खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत १ लाख खाटांची व्यवस्था करणार- टोपे
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 1 लाख खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारपासून वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बीकेसीमधील कोरोना केअर सेंटरची पाहणी केली. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी माध्यमांना टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

करोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना पुरेशा खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली आहे. नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही अशा प्रकारे करोना केअर सेंटर्स उभारली जातील, असं यावेळी टोपे म्हणाले. मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा करोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

टोपे म्हणाले की, वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ६०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्यालगत असलेल्या नेहरू प्लॅनेटोरियम येथेही सुमारे ५०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. गोरेगाव येथील सुविधा केंद्र आठवडाभरात सुरू होईल. बीकेसी येथील करोना केअर सेंटर केवळ २० दिवसांमध्ये तयार करण्यात आले आहे. त्याममध्ये १ हजार ८ खाटांची सुविधा असून तेथे नव्याने एक हजार खाटांचे अतिदक्षता विभागसुद्धा उभारला जात आहे.



हेही वाचा -

लाॅकडाऊनचा चौथा टप्पा कसा? मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा
मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा