Advertisement

घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, राजेश टोपेंचा इशारा

ज्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे, ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे.

घराबाहेर पडाल तर खासगी रुग्णालयात दाखल करू, राजेश टोपेंचा इशारा
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. ज्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे, ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी नियम पाळले नाहीत तर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करू आणि त्याचा खर्च देखील त्यांनाच करावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, आदी उपस्थित होते.

शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा, ऑक्सिजन, तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा, असं असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

तसंच वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून, प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. सक्रिय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार आहे, असं टोपे म्हणाले.



हेही वाचा

जसलोक आता कोविड रुग्णालय; महापालिकेचा निर्णय

उपनगरीय रेल्वतून सर्वसामान्यही करू शकतात प्रवास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा