Advertisement

अनेक आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.

अनेक आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.  त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या चर्चगेट येथील कान, नाक आणि घशाच्या (ईएनटी) दवाखान्यात १३ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. याशिवाय शिवडीच्या टीबी रुग्णालयात एक डॉक्टर आणि वॉर्डबॉयलाही कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे.

 चर्चगेटमधील पालिकेच्या कान, नाक आणि घसा रुग्णालयात आधीपासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात १३ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले.

शिवडीच्या टीबी रुग्णालयातील एक डॉक्टर आणि वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णालयातील १० डॉक्टरांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. यापूर्वी या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रुग्णालयातील ७० जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. गेल्या ४ दिवसांत रुग्णालयात ३ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ८० लोकांचं विलगीकरण करण्यात आलं होतं.

मुंबईत आतापर्यंत २७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात नर्सेसची संख्या सर्वाधिक आहे.  वोकहार्टनंतर जसलोक आणि भाटिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लागण झाल्याचं दिसून आलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत ३०३२ कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात आढळले ४६६ नवे रुग्ण

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा