Advertisement

कोरोना रुग्णांवर 'प्लाझ्मा थेरेपी'चा वापर बंद

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) कोविडच्या उपचारांतून 'प्लाझ्मा थेरेपी'चा वापर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SHARES

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) कोविडच्या उपचारांतून 'प्लाझ्मा थेरेपी'चा वापर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीएमआरच्या नव्या आदेशानुसार, देशात यापुढे कोविड रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार नाही. कोरोना संक्रमित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अनेक जणांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात आला आहे. परंतु, त्यानंतरही संक्रमितांचा मृत्यू आणि आजाराची गंभीरता कमी होण्यास मदत झालेली दिसून आली नाही.

आयसीएमआर, कोविड १९ वर गठीत करण्यात आलेली नॅशनल टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी महत्त्वाची मानली जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचा मोठा फायदा होत नसल्याचं मत अनेक घटकांतून व्यक्त झाल्यानंतर या थेरपीची शिफारस यापुढे न करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात आयसीएमआरची बैठक पार पडली. या बैठकीत प्लाझ्मा थेरपीचा मर्यादित उपयोग व अनेकदा या उपायाचा अयोग्य वापराच्या बाबी लक्षात घेता तिच्या वापराची शिफारस थांबवावी, असं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.

उपचारांच्या मार्गदर्शक तत्वांमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला, अशी माहिती आयसीएमआरतर्फे रात्री देण्यात आली. टास्क फोर्सनं कोविड रुग्णांसाठी नव्या गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार, कोविड रुग्णांना ३ प्रकारांत विभागण्यात आलं आहे.

ICMR च्या नव्या गाईडलाईन्स

  • पहिला : अगदी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण - या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • दुसरा : मध्यम तीव्रतेची लक्षणं असलेले रुग्ण - या रुग्णांना कोविड वॉर्डमध्ये दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • तिसरा : गंभीर लक्षणं असलेली रुग्ण - या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.हेही वाचा -

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा