Advertisement

प्राण्यांच्या डोळ्यांवरील उपचारासाठी मुंबईत पहिले 'आय स्पेशलिस्ट हॉस्पिटल' सुरू

प्राणी व पक्षांच्या डोळ्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईत आय स्पेशलिस्ट रुग्णालय सुरु करण्यात आलंं आहे. 'द आय व्हीट' असं या आय स्पेशलिस्ट रुग्णालययाचे नाव असून, डॉ. कस्तुरी भाडसाळवे यांनी सुरु केलं आहे.

प्राण्यांच्या डोळ्यांवरील उपचारासाठी मुंबईत पहिले 'आय स्पेशलिस्ट हॉस्पिटल' सुरू
SHARES

‘डोळे’ हा शरीरातील सर्वात नाजूक अवयव मानला जात असून, डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे मानवाच्या डोळ्याला इजा झाली तर त्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी मुंबईसह राज्यभरात अनेक स्पेशलिस्ट डॉक्टर आणि रूग्णालय आहेत. परंतू, अशाच प्रकारची इजा जर एखाद्या प्राणी व पक्षाला झाली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आय स्पेशलिस्ट रुग्णालय नाही. मात्र, प्राणी व पक्षांच्या डोळ्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी मुंबईत आय स्पेशलिस्ट रुग्णालय सुरु करण्यात आलंं आहे. 'द आय व्हीट' असं या आय स्पेशलिस्ट रुग्णालययाचे नाव असून ते डॉ. कस्तुरी भाडसाळवे यांनी सुरु केलं आहे. 


ऑपरेशन थिएटरची सुविधा

डॉ. कस्तुरी भाडसाळवे यांनी मुंबईतील चेंबुर परिसरात रविवारी पहिलं प्राणी-पक्षांच्या डोळ्यांवरील आजारांवर उपचार करणारे 'द आय व्हीट' रुग्णालय सुरु केलं आहे. या रुग्णालयात प्राण्याच्या डोळ्यांमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून ते आधुनिक शस्त्रक्रियांपर्यंत सर्वप्रकारचे उपचार करण्यात येतील. शस्त्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑपरेशन थिएटरची सुविधा देखील या रुग्णालयात उपलब्ध आहे. 


पक्षांवरही उपचार

या रुग्णालयात पाळीव श्वान, मांजर, ससा यांसारख्या अनेक प्राणी तसंच पक्षांवर उपचार केले जातात. तसंच, घोडा, हत्ती यांसारख्या मोठ्या प्राण्याच्या डोळ्यांवर त्यांच्या ठिकाणी जाऊन उपचार केले जात असल्याची माहिती डॉ. कस्तुरी भाडसाळवे यांनी दिली. 



मुंबईमध्ये प्राण्यांच्या डोळ्यांवर उपचार करणारे रुग्णालय नाही. त्यामुळं हे रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे. या रुग्णालयात कोणत्याही प्राण्याचा डोळ्याला अचानक इजा झाली तर, त्यावर योग्य ते उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसंच हे भारतातील पहिलं रुग्णालय आहे.

- डॉ कस्तुरी भाडसाळवे



हेही वाचा -

बघा असा आहे, अमिताभ, शाहरुखचा 'बदला अनप्लग्ड'!

आयपीएलमध्ये कॅच घ्या, SUV कार जिंका!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा