Advertisement

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्ण संख्येत वाढ

दिवाळीनंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमीच आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्ण संख्येत वाढ
SHARES

दिवाळीनंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमीच आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईत १५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

नवी मुंबईत मागील पाच दिवसात ७५२ नवीन रुग्ण आढळले. दिवाळीपूर्वी उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आली होती. ११ नोव्हेंबर रोजी सर्वात कमी १२४७ रुग्ण उपचार घेत होते . मात्र, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रोज शंभरच्या खाली आलेली रुग्णसंखा आता दोनशेपर्यंत गेली आहे. २० नोव्हेंबरपासून ७५२ नवीन रुग्ण आढळले आहते. तर ५८७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांतही वाढ होऊ लागली आहे.

दरम्यान, पालिकेकडे उपलब्ध खाटांची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोरोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची सध्या गरज नाही, असं पालिका प्रशासनाने म्हटलं आहे. दिवाळीमध्ये अनेक नागरिक बाहेर पडले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली.  दिवसाला नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा ३ अंकांवर आली आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १८० रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,५५० झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५,०७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९६९ झाला आहे. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे.  हेही वाचा -

26/11 Mumbai Attack : ७ कोटीचे मोबाईल स्कॅनर व्हेईकल धूळखात पडून

मुंबई विमानतळावर १८ कोटींचे कोकेन जप्तRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा