Advertisement

कांजुरमार्गला रिक्षात सापडलेल्या बाळावर होणार शस्त्रक्रिया


कांजुरमार्गला रिक्षात सापडलेल्या बाळावर होणार शस्त्रक्रिया
SHARES

कांजुरमार्ग परिसरात सोमवारी सकाळी एक बाळ बेवारस अवस्थेत रिक्षात सापडले होते. त्या बाळाला हायड्रोसिफलस नावाचा मेंदूसंबंधित आजार असल्याचं सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बाळावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


नेमकी काय घडली होती घटना?

सोमवारी सकाळी कांजुरमार्ग परिसरात एका अमन नावाच्या मुलाला त्याच्या मित्रासोबत असताना एक स्त्री जातीचं अर्भक रिक्षात सापडलं. त्यांनी त्या मुलीला पोलिसांच्या मदतीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या बाळाला मेंदूसंबंधीचा आजार असल्याचं डॉक्टरांना समजलं.




काय आहे हा आजार?

हायड्रोसिफलस या आजारात मेंदूत पाणी साचतं. शिवाय, मेंदूच्या काही भागाला सूज देखील येते. त्यामुळे अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं, असंही डॉ.मोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

त्या बाळाची तपासणी सुरू असून किती लवकर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, हे सर्जन ठरवणार आहेत. त्यानुसार तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिवाय, आता त्या बाळाची प्रकृती ठीक आहे.

डॉ. जयश्री मोंडकर, अधिष्ठाता, सायन रुग्णालय

या बाळाच्या सिटीस्कॅन, एमआरआय अशा तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या तपासण्यांच्या रिझल्टनुसारच शस्त्रक्रिया किती लवकर करायची हे निश्चित होईल, असं ही डॉ. मोंडकर यांनी सांगितलं आहे.

हे स्त्री जातीचं बाळ असून तिचं वजन 2.4 किलो एवढं आहे आणि ते 15 दिवसांचं आहे. या बाळाला सध्या नवजात बालकांची काळजी घेणाऱ्या कक्षात दाखल करण्यात आलं आहे.



हेही वाचा

लहानग्यांसाठी मुंबई होणार अधिक सुरक्षित, प्रत्येक पोलिस ठाण्यात पॉक्सो युनिट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा