Advertisement

मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर

मुंबईत कोरोनावरील लसीकरणाची जय्यत तयारी महापालिकेकडून सुरू आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचे रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रांमध्ये केले जाणार आहे.

मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर
SHARES

मुंबईत कोरोनावरील लसीकरणाची जय्यत तयारी महापालिकेकडून सुरू आहे. मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचे रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रांमध्ये केले जाणार आहे.  बीकेसी, गोरेगाव नेस्को, दहिसर, मुलुंड, एनएससीआय वरळी, या ठिकाणी ही जम्बो लसीकरण केंद्रे असतील. जम्बो कोव्हिड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत.

जम्बो कोव्हिड सेंटरची रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे या ठिकाणी फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्या सेंटरचा वापर लसीकरण केंद्रांसाठी केला जाणार असल्याचं कोव्हिड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितलं. 

बीकेसीमधील कोव्हिड सेंटरमध्ये जेथे रुग्ण नाहीत, अशा जागेत जम्बो लसीकरण केंद्र सुरू होत आहे. यात दिवसाला अडीच ते पावणे तीन हजार रुग्णाला लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रात १० युनिट असणार आहे. यातील प्रत्येक युनिटमध्ये डॉक्टरांची स्वतंत्र टीम असणार आहे. या जम्बो लसीकरण केंद्राचा जम्बो कोविड केंद्राशी कोणतीही संबंध नसेल. ही सर्व व्यवस्था स्वतंत्र असणार आहे.

मुंबईतील सायन, केईएम, नायर आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयात कोरोनाची लस ठेवली जाणार आहे. तर कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत ५ हजार चौरस फूट जागेत कोरोना लस साठवली जाणार आहे. मुंबईत लसीकरणासाठी १०० केंद्र तयार करण्यात येणार आहेत. या केंद्राद्वारे रोज ५० हजार नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.

सध्या रोज १२ हजार मुंबईकरांना लस देण्याचं उद्दिष्ट पालिकेने ठेवलं आहे. सुरुवातीला ८ केंद्रांमार्फत कोरोनाची लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्र पालिकेची रुग्णालये, उपनगरांतील पालिकेशी सलग्न १७ रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने येथे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.



हेही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा