Advertisement

डोंबिवलीत १८५ खाटांचं कोरोना केंद्र सुरू

या कोरोना केंद्रात कृत्रिम श्वसन यंत्रणा, बायपॅप, रुग्णांसाठी मनोरंजन म्हणून संगीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डोंबिवलीत १८५ खाटांचं कोरोना केंद्र सुरू
SHARES

कल्याण - डोंबिवली महापालिका प्रशासनाने डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात कोरोना आरोग्य केंद्र सुरू केलं आहे. १८५ खाटांचं हे कोरोना केंद्र मंगळवारपासून सुरू झालं आहे.


या कोरोना केंद्रात कृत्रिम श्वसन यंत्रणा, बायपॅप, रुग्णांसाठी मनोरंजन म्हणून संगीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  हे केंद्र शास्त्रीनगर रुग्णालयाच्या अखत्यारीत चालविलं जाणार आहे. महापालिका हद्दीतील वाढत्या रुग्णांना तात्काळ स्थानिक पातळीवर वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी हे कोरोना केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून पालिकेच्या आणि पालिका नियंत्रित कोरोना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. 


या कोरोना केंद्रातच १५५ खाटांना प्राणवायूची सुविधा उपलब्ध आहे. तर ३० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. थंडावा राहावा म्हणून पंख्यांबरोबर वातानुकूलित यंत्रणाही (कम्फर्ट कूलिंग) उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांचा मानसिक तणाव कमी व्हावा म्हणून मंद आवाजातील गाणी ऐकण्याची सुविधा येथे आहे. तसंच जीवनसंदेश देणारी भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत. १४ हजार चौरस फूट जागेत ही सुसज्ज यंत्रणा अल्पावधीत उभारण्यात आली आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा