Advertisement

हार्टअटॅक येण्याआधी जाणवतात 'ही' लक्षणं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचं दुपारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

हार्टअटॅक येण्याआधी जाणवतात 'ही' लक्षणं, जाणून घ्या संपूर्ण माहिती
SHARES

कन्नड (kannada) सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार (puneet rajkumar) यांचं दुपारी हृदयविकाराच्या (Heart breaking) झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (Shocking) घेतला. राजकुमार जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

हृदय विकाराचा झटका म्हणजे काय? त्याची नेमकी कारण काय? हृदय विकाराचा झटका येण्याआधी काय लक्षणं जाणवतात? हे जाणून घेऊयात.

हृदय विकाराचा झटका म्हणजे काय?

हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला 'झटका' असा शब्द पडला आहे. हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो.

हृदय विकाराची कारणं काय?

  • हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
  • धूम्रपान आणि मद्यपान
  • अति रक्तदाबामुळे हृदयावर जादा लोड/दबाव येतो त्यासाठी लागणारा हृदयाचा रक्तप्रवाह कमी पडतो.
  • भावनिक ताण (राग, भीती) अचानक येऊन कमकुवत हृदय बंद पडते.
  • शक्यतेपेक्षा अधिक श्रम आणि जोर लावणे
  • रक्ताच्या बारीक गाठी हृदय-रक्तवाहिन्यात अडकून प्रवाह बंद पडणे

हृदयविकाराची लक्षणं

  • दम लागणे
  • घाबरल्यासारखं होणं
  • छातीत धडधडणं
  • खूप घाम येणे
  • कधी कधी छातीत नुसतीच जळजळ होणे
  • पाठीकडे खूप दुखणे


‘असे’ करा निदान

  • निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक
  • इसीजी यांच्या मदतीने निदान करून घेणे
  • ECG कार्डिओग्राम
  • स्ट्रेस टेस्ट
  • स्ट्रेस थॅलियम/परफ्यूजन टेस्ट
  • ऍंजियोग्राफी


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही निर्णय घेऊ नका. आम्ही फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आरोग्याशी निगडीत समस्यांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार करावेत.



हेही वाचा

मुंबईत पालिका उभारणार अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा