पायातील वेदनांकडं दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो 'हा' आजार


पायातील वेदनांकडं दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो 'हा' आजार
SHARES

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावरही दिसतो. लहान लहान पण दुर्लक्षित होणाऱ्या गोष्टींमुळं अनेक लाईफस्टाईल आजार बळावत आहेत. त्यापैकी एक आजार म्हणजे 'व्हेरिकोज व्हेन्स’. व्हेरिकोज व्हेन्सचं दुखणं फारच त्रासदायक असतं. आपलं जसं वय वाढत जातं, तसा 'व्हेरिकोज व्हेन्स' या विकाराचा धोका वाढत जातो. प्रौढ व्यक्तींपैकी एकाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असतो. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असलेल्या प्रौढांपैकी अधिक प्रौढांचं वय ६० वर्षे किंवा त्याहून जास्त असतं.

'व्हेरिकोज व्हेन्स’ हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळं त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्हमागील बाजूनं काम करणं कमी करतात, त्यामुळं तिथला रक्तप्रवाह खंडित होतो. या व्हेन्स कालांतराने मोठ्या व वाकड्या दिसू लागतात. त्यांना व्हेरिकोज व्हेन्स असं म्हटलं जा.

सतत जास्तवेळ उभं राहणं हे व्हेरिकोज व्हेन्सचं महत्त्वाचं कारण समजलं जातं. रक्‍तवाहिन्यांमधील झडपांमध्ये दोष उत्पन्‍न होणं, हेही मुख्य कारण आहे. व्हॉल्व्हमधील दोष हे जन्मजात विकृती, रक्‍तवाहिन्यातील रक्‍ताची गुठळी अथवा रक्‍तवाहिनीला सूज येणं यामुळे प्रामुख्यानं उत्पन्‍न होत असतात. अशुद्ध रक्‍तवाहिनीत दोष उत्पन्‍न झाल्यास ज्या रक्‍तवाहिनीतून त्यामध्ये अशुद्ध रक्‍त येत असते, ती शीर फुगते आणि त्रास जाणवतो.

व्हेरिकोज व्हेन्स हा आजार झाल्यास त्याच्यावर उपचार कसे करावे आणि हा आजार झालेलं शरीरास किती धोकादायक असतं याबाबत डोंबिवली येथील 'सुरेखा व्हेरिकोज व्हेन्स' या क्लिनिकचे डॉ. आशीष धडस यांना माहिती दिली आहे. डॉ. आशीष धड, यांच्यामते हा आजार प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या होतो. तसंच, गरोदर असलेल्या स्त्रियांना किंवा अगोदर गर्भारावस्थेतून गेलेल्या स्त्रियांना होतो. त्याशिवाय दीर्घकाळ उभं राहिल्यास देखील या आजाराला सामोरं जाव लागतं. व्हेरिकोज व्हेन्स स्त्री व पुरुष दोघांना होणारा आजार आहे. पायात त्राण नसल्यासारखं वाटणं, गोळे येणं, वेदना होणं आणि घोट्यांना सूज येणं ही व्हेरिकोज व्हेन्स या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळं या व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार केले नाहीत, तर त्या शिरा जाड, कडक आणि वेदनादायी होतात.

व्हेरिकोज व्हेन्स हा विकार वाढला, तर त्यातून गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं हा आजार झाल्यास सुरुवातीला उपचार करणं सोपं असतं. लेझर उपचार ही 'व्हेरिकोज व्हेन्स'वरील जगातील स्वीकारली गेलेली व पसंती दिली जाणारी उपचारपद्धती आहे. निष्पत्तीचा विचार करता ही उपचारपद्धती ओपन शस्त्रक्रियेच्या तुलनेत श्रेष्ठ आहे. शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्रण राहत नाही. त्यात वेदना कमी असतात आणि ४८-७२ तासांत रुग्ण दैनंदिन कामं करू शकतो.

ईव्हीएलटीशिवाय क्रायो लेसर आणि क्रायो स्क्लेरोथेरपी (CLaCS) या उपचारपद्धती सुरेखा व्हेरिकोज व्हेन्समध्ये भारतात प्रथमच वापरण्यात आल्या आहेत. पायातील छोट्या व्हेरिकोज व्हेन्स व स्पायडर व्हेन्सवर उपचार करणारे हे क्रांतीकारी ब्राझिलियन तंत्र आहे. CLaCS हा विविध तंत्रज्ञानांचा संयोग आहे. ऑगमेंटेडे रिअॅलिटी, ट्रान्सडर्मल लेजर, स्क्लेरोथेरपी आणि स्थानिक भूल देऊन त्वचा थंड करणं या तंत्रज्ञानांचा यात समावेश आहे' सं डॉ. आशीष धडस यांन सांगितलं.


या आजारावरील उपाय

  • तुमच्या पायाला सूज येत असल्यास रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आठवणीनं स्टॉकींग्स घाला.
  • जर तुम्हाला वेरीकोस वेन्सची समस्या असेल तर त्यामुळं कोलेजीन पेशी कमजोर व लवचिक होतात. त्यामुळं लवकर जखमा होणं अथवा त्यातून रक्त येण्याची शक्यता असतेयासाठी तुमच्या शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहणं बंधनकारक आहे
  • जर तुमचा डेस्क जॉब असेलसतत विमानानं प्रवास करीत असाल किंवा तुम्ही उभं राहून काम करीत असाल तर तुम्ही पायात स्टॉकींग्स वापरणं गरजेचं आहे
  • नियमित व्यायाम करा त्यामुळं तुमचा रक्तप्रवाह सुधारेल व तुमचं वजन देखील नियंत्रणात राहील. 
  • जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर पायावर त्याचा दाब येऊन ही समस्या अधिकच वाढू शकते.
  • चालताना पायावर कमी दाब येण्यासाठी फ्लॅट अथवा कमी हिल्सचे शूज वापरात्याचप्रमाणं उंच टाचाचे शूज वापरणं जाणिवपूर्वक टाळा.हेही वाचा -

वाहनतळांचा वापर न करणाऱ्या बसवर कारवाई

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील १२ हजार बेशिस्त चालकांवर कारवाईसंबंधित विषय