Advertisement

ठाण्यातील लाॅकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवला

ठाण्यातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत सुरूच ठेवण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या नियमानुसार मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स, जीम व स्विमिंग पूलवरील निर्बंध कायम कायम असणार आहेत.

ठाण्यातील लाॅकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवला
SHARES

ठाण्यातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत सुरूच ठेवण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या नियमानुसार मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स, जीम व स्विमिंग पूलवरील निर्बंध कायम कायम असणार आहेत. कोरोनाबाधितांची संख्या अजूनही नियंत्रणात न आल्याने ठाण्यातील लाॅकडाऊन पुढं ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिम शर्मा यांनी दिली. (lockdown extended in thane containment zones till 31st august)

राज्यभरात १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ५ ऑगस्टपासून राज्यभरात मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ठाण्यातील रहिवाशांना मात्र पुढचा महिनाभर तरी लाॅकडाऊनच्या निर्बंधाचं पालन करावं लागणार आहे. 

हेही वाचा - मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस

ठाण्यातील कडक लॉकडाऊन १९ जुलैपासून शिथिल करण्यात आला होता. लाॅकडाऊनचे निर्बंध केवळ कंटेन्मेंट झोनपुरतेच मर्यादीत ठेवण्यात आले होते. हे निर्बंध नव्या आदेशानुसार ३१ आॅगस्टपर्यंत सुरूच राहतील. या निर्बंधानुसार लॉकडाऊनच्या काळात मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, जीम व स्विमिंग पूल वगळता सर्व भाजी मंडई, बाजारपेठा, आणि दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सम व विषम तत्वावर सुरु ठेवण्यास परवानगी असेल. अटी व नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील महापालिकेकडून देण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला १८,७०८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १३३०९ रुग्ण बरे झाले असून ४७९७ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ६०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात ३० जुलैपर्यंत एकूण ९१,७८४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित विषय
Advertisement