Advertisement

मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि फायरब्रँड नेते अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड अशा ५ जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांना ५ जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि फायरब्रँड नेते अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड अशा ५ जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: ही माहिती दिली. वसई-विरार पालिका आयुक्तांच्या दालनात अविनाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एक आंदोलन केलं होतं. त्याप्रकरणी विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी ही नोटीस बजावली आहे. ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहून खुलासा करण्याचे निर्देश या या नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. (mns leader avinash jadhav gets deportation notice from maharashtra police)

कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करत असतानाच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. यानंतर अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, मी मागच्या अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांसाठी आंदोलने करतोय. कुठलंही आंदोलन हे मी माझ्यासाठी केलेलं नाही. वसईतही जे आंदोलन केलं होतं, ते कोविड सेंटरसाठी केलं होतं. आजही जे आंदोलन करतोय ते विदर्भ, मराठावाडा, सांगली, सातारा इथून आलेल्या भगिनींसाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असतानाच मला तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

 हेही वाचा - ठाकरे सरकार की, लिव्ह इन रिलेशनशिप?- देवेंद्र फडणवीस


मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड अशा ५ जिल्ह्यांमधून २ वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्यात एवढे गुंड आहेत, ते अजूनपर्यंत पडीपार झालेले नाहीत, नाही मला तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. हे आंदोलन करतानाही माझ्यावर सातत्याने दबाव येतोय, तरीही आंदोलन सुरूच आहे. म्हणजे लोकांसाठी आम्ही भांडायचं नाही का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझी पहिली सभा झाली तेव्हा मला १ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला होता. तेव्हाच मी सांगितलं होतं की मला तडीपारीच्या नोटीस बजावण्यात येतील. लोकांसाठी काम करण्याचं सरकारकडून मिळालेलं हे बक्षीस आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.

मी कोकणासाठी ज्या मोफत १०० बस सोडणार आहे, त्याचं मिळालेलं हे बक्षीस आहे. या मुलींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं सरकारने दिलेलं हे गिफ्ट आहे. पोलिसांचं बिल कमी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर जाऊन जे आंदोलन केलं त्याचं महाराष्ट्र सरकारने दिलेलं हे बक्षीस आहे. याच्यापुढे लोकांची काम करायची की नाही ? रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवायचं आहे. यानंतरही मी थांबणार नाहीय. अशा शब्दांत अविनाश जाधव यांनी आपला राग व्यक्त केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा