Advertisement

ठाकरे सरकार की, लिव्ह इन रिलेशनशिप?- देवेंद्र फडणवीस

हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अशी खोचक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ठाकरे सरकार की, लिव्ह इन रिलेशनशिप?- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे सरकार आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आहोत, असं भासवतं. प्रत्यक्षात मात्र हे एक दुंभगलेलं कुटुंब आहे. खरं तर हे कुटुंब देखील नाही. तर हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अशी खोचक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. (thackeray government is like leave in relationship says bjp leader devendra fadnavis)

तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरींकडे पाहता हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं भाकीत वर्तवलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार किती काळ सत्तेत राहील, याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार आलेलं मी कधीच चाललेलं नाही. देशाच्या या इतिहासात महाराष्ट्र अपवाद ठरेल असं देखील मला वाटत नाही. ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्यात आम्हाला अजिबात रस नाही. या सरकारमध्ये मतभेदच इतके आहेत की हे सरकार आपसातील अंर्तविरोधामुळेच पडेल. ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी मजबूत सरकार देण्याची जबाबदारी आमची असेल आणि आम्ही तसं सरकार देऊ, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.  

हेही वाचा- पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकललं, ‘या’ तारखेपासून घेण्याची शिफारस

हे ऑटोरिक्षा सरकार आहे. ज्याची तीन चाक तीन दिशेला आहेत. रिक्षा स्थिर असते. ते सन्मानजनक वाहन आहे. पण रिक्षाची गती मर्यादीत असते. रिक्षातून एका गावामधून दुसऱ्या गावाला जाता येत नाही. त्यासाठी तुम्हाला ट्रेनची गरज लागते. हे मर्यादीत क्षमता असलेलं सरकार आहे. राज्यात करोनाचं संकट असल्याने सरकारला दोन आघाड्यांवर लढावं लागेल. कोरोनाशी सामना करतानाच राज्य सरकारला राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर आणावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. किमान राज्याचं अर्थचक्र गतिमान करण्यासाठी समित्यांनी दिलेल्या अहवालांची अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा येत्या काळात उद्योग आणि सेवा क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. हातपाय गाळून बसणं राज्याला परवडणार नाही, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा- Raj Thackeray: राज ठाकरेंनी केलं ठाकरे सरकारबद्दल ‘हे’ भाकीत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement