Advertisement

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचं प्राधान्याने लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचं फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्यानं लसीकरण करा व त्यासाठी लवकरात लवकर नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचं प्राधान्याने लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचं फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्यानं लसीकरण करा व त्यासाठी लवकरात लवकर नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात दररोज येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणं गरजेचं आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक-दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसंच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा- मंत्रालयातील कामाच्या वेळा दोन शिफ्ट्समध्ये करा, मुख्यमंत्र्यांची सूचना

मंत्रालयात सुमारे ५ हजारहून अधिक कर्मचारी विविध विभागांमध्ये काम करतात. त्यापैकी ७५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना मागील २ ते ४ दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं पुढं आलं आहे. शिवाय मंत्रालयात सातत्याने येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीमुळेही कोरोनाचा धोका वाढलेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने कार्यालयीन वेळा बदलण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.

आरोग्य तपासणी

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचं प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावं तसंच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. जेणेकरून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल. यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा