Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

‘त्यांचे’ अश्रू कसे पुसू?, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी अतिशय धक्कादायक, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

‘त्यांचे’ अश्रू कसे पुसू?, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
SHARES

नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी अतिशय धक्कादायक, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना (covid 19 patients) रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन कसं करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचं दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी करण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोनाच्या संकटामुळे (coronavirusदेश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. कोरोनाशी विषम प्रकारची लढाई सुरू आहे. कुठं प्राणवायू नाही, कुठं औषधं नाहीत, कुठं बेड नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिकची ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचं राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा- "निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार?"

५ लाख रुपये मदत जाहीर 

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितलं आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन पुढे जावं लागेल हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत असे जीव जाणं मनाला अतिशय बोचणारं आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये. यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे.

कोरोनाच्या (coronavirus) या लाटेत ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सूचना दिल्या आहेत, असं असताना हे कसं घडलं ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी, असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

maharashtra cm uddhav thackeray reaction on nashik hospital oxygen leak incident)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा