Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

"निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार?"

निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

"निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार?"
SHARES

राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतानाच नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. त्यावर टीका करताना निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीत बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास टँकरमधून आॅक्सिजन भरण्यात येत असताना ही गळती सुरू झाली. यावेळी रुग्णालयात जवळपास १३१ रुग्ण उपचार घेत होते. आॅक्सिजन गळतीमुळे दाब कमी होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. तर ३ ते ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच ६ ते ७ रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आल्याचंही समजत आहे.

हेही वाचा- पंतप्रधान म्हणाले लाॅकडाऊन शेवटचा पर्याय, पण महाराष्ट्रात सध्या त्याचीच गरज- राजेश टोपे

या घटनेवर भाष्य करताना प्रविण दरेकर यांनी निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? असा प्रश्न सरकारला विचारतानाच नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितलं, अशी माहिती दिली.

झाकीर हुसेन रुग्णालय नाशिक शहरातील मोठ्या रुग्णालयापैकी एक असून या ठिकाणी शहर आणि जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारांसाठी दाखल होतात. एकूण १७० बेडचं हे रुग्णालय असून त्यामध्ये १७ बेड हे व्हेंटिलेटरचे होते. तर १३१ रुग्ण उपचार घेत होते.  

(bjp leader pravin darekar criticizes maharashtra government on nashik hospital oxygen leak incident)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा